प्रेस मीडिया लाईव्ह :
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मोहित कंबोज बदनामी प्रकरणात शिवडी कोर्टाकडून त्यांना नियमित जामीन मंजूर करण्यात आला आहे.
दोन लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. रोख रक्कम भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.नवाब मलिक यांना मोहित कंबोज बदनामी प्रकरणात शिवडी कोर्टानं मोठा दिलासा दिला आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आपली बदनामी केल्याचा आरोप करत, भाजप नेते मोहित कंबोज यांनी 2021 साली मलिक यांच्याविरोधात फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला होता. या खटल्याच्या सुनावणीसाठी मोहित कंबोज यांची कोर्टात आग्रही भूमिका होती.
दरम्यान आता या प्रकरणात नवाब मलिक यांना न्यायालयाकडून नियमित जामीन मंजूर करण्यात आला आहे.