प्रेस मीडिया लाईव्ह :
मिरज प्रतिनिधी : धनंजय हलकर शिंदे
जालना येथे मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज च्या निषेधार्थ मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा शिवतीर्थवर मिरजेतील मराठा समाजाकडून तीव्र निदर्शने करण्यात आली .
संविधानिक मार्गाने आरक्षणासाठी मराठा समाजाकडून आंदोलन सुरू असताना पोलिसांनी केलेल्या लाठी चार्ज बाबत उपमुख्यमंत्री तथागृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली मराठा क्रांती मोर्चा चे आंदोलन हे आरक्षणासाठी असून अजून पर्यंत निघालेले मूक मोर्चा आंदोलने हे संविधानिक मार्गाने झालेले असताना पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज बाबत संतप्त प्रतिक्रिया देण्यात आली येणाऱ्या निवडणुकीत राज्यातील भाजप पक्षाला मराठा समाजाकडून योग्य उत्तर दिले जाईल असा इशारा यावेळी निदर्शने करणाऱ्या मराठा समाजातील सदस्यांनी दिला सदर जालना मधील झालेल्या पोलिसांकडून लाठीचार्ज चा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला हो सकता दारी शिंदे फडणवीस आणि पवार वर टीका करण्यात आली यावेळी मिरजेतील सकल मराठा समाज सदस्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
Tags
मिरज