प्रेस मीडिया लाईव्ह :
मिरज प्रतिनिधी : धनंजय हलकर शिंदे
जालना येथे मराठा समाजातील आंदोलकांच्या वर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज निषेधार्थ सांगली जिल्हा बंदला मराठा क्रांती मोर्चा तर्फे हाक देण्यात आली होती या अनुषंगाने मिरज शहरात ही कडकडीत बंद पाळण्यात आला
सकाळी सकल मराठा समाजा तर्फे मोटर सायकल रॅली काढून बंदला आवाहन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मिरज या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चा तसेच सकल मराठा समाजाचे.विलास देसाई,राज्य समन्वयक.धनंजय हलकर(जिल्हा समन्वय),माजी सभापती.संदीप आवटी नगरसेवक करण जामदार, महासंघाचे अभिजीत शिंदे दिगंबर जाधव.मदन तांबडे,प्रकाश आहिरे,नरेंद्र मोहिते,. बाळासाहेब निपाणी पाटील,संतोष माने, गजानन शिंदे,अनंत शिंदे, प्रशांत चव्हाण, जैलाब शेख,- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सचिव मिरज शहर,नजीर झारी - वंचित बहुजन आघाडी यांचे प्रमुख उपस्थितीत जालना येथे झाले मराठा समाजातील आंदोलकांवर लाठी चार्जचे निषेधार्थ सांगली जिल्हा बंद या अनुषंगाने मिरज शहरात मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती मोटरसायकलावरून मराठा समाज बांधवांनी शहरात फिरून कडकडीत बंदला प्रतिसाद देण्याचे आवाहन केले आज कडकडीत बंद असल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले होते, सराफी पेठ, कापड दुकान बाजार,फळ मार्केट,भाजीपाला बाजार परिसर बंद असल्याने सर्वत्र शुकशुकाट होता बंदमध्ये सर्व व्यापाऱ्यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले.