प्रेस मीडिया लाईव्ह :
मिरज प्रतिनिधी : धनंजय हलकर शिंदे
मिरज : आज सांगली जिल्हा मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीने मराठा सेवा सांस्कृतिक भवन येथे मराठा क्रांती मोर्चा जिल्ह्याची बैठक आयोजित करण्यात आले होती.
यावेळी जालना येथे संविधानिक व शांततेच्या मार्गाने आंदोलन चालू असताना त्यांच्यावर अमानुषपणे लाठीचार्ज गोळीबार अश्रूधुराच्या नळकांडे फोडण्यात आल्या त्याच्या निषेधार्थ दिनांक गुरुवार 7 /9 /2023 रोजी सांगली जिल्हा बंद ची हाक देण्यात आलेले आहे यावेळी जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चा चे संयोजक आयोजक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते सर्व मराठा बांधव त्या बैठकीस उपस्थित होते यावेळी सांगली जिल्हा कडकडीत बंद करण्याचे आवाहन सर्व मराठा बांधवांनी सर्व जिल्ह्यातील तमाम व्यापारी वर्गांना विनंती करण्यात आलेली आहे