उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून बेडग कमान प्रश्न सोडवणार: राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात



प्रेस मीडिया लाईव्ह : 

विशेष प्रतिनिधी : संभाजी चौगुले :

 कोल्हापूर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात काल कोल्हापूर दौऱ्यावर आले असता बेडग येथील भीम बांधव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान पूर्ववत व्हावी याकरिता तेथील आंबेडकरी समाज हा माणगाव ते मुंबई असा लाँग मार्च काढला आहे 

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी जाहीर पाठिंबा दिला व सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी चर्चा करून बेडग कमान प्रश्न सोडवनार असल्याचं त्यांनी सांगितलं तसेच वेळ पडली तर या लाँग मार्च मध्ये स्वतः तुमच्या सोबत येणार आहे असे ते म्हणाले यावेळी उपस्थित महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष टिपू भाई पटवेकर, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष हर्षवर्धन आचार्य, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष आकाश कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष हर्षादकुमार कांबळे, कामगार आघाडी जिल्हा अध्यक्ष संजय कांबळे, हातकणंगले तालुका अध्यक्ष अजित शिंदे, युवा उद्योजक धनंजय अजवेकर, अभी कोगले, लखन सर्वदे, तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील व सांगली जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post