प्रेस मीडिया लाईव्ह :
अतिग्रे प्रतिनिधी : भरत शिंदे
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष व रुकडी केंद्राचे केंद्रप्रमुख यांच्या हस्ते सारथी पुणे यांच्या मार्फत छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित निबंध स्पर्धेमध्ये अतिग्रे विद्यामंदिर या शाळेतील मुलांना घवघवीत यश मिळाले
मोठा गट - पायल स्वप्निल कांबळे इयत्ता सहावी (तृतीय क्रमांक)
लहान गट - 1) राघव रोहित कांबळे इयत्ता चौथी (चौथा क्रमांक) 2) विदिशा विठ्ठल गुरव इयत्ता पाचवी (पाचवा क्रमांक) 3) शरण्या विजय स्वामी इयत्ता पाचवी (आठवा क्रमांक) या सर्व विद्यार्थ्यांचे केंद्रप्रमुख यांचे मार्फत स्वागत व सत्कार करण्यात आला तसेच केंद्रप्रमुख श्री शशिकांत पाटील यांची कन्या कुमारी ऐश्वर्या पाटील हिने राजीव गांधी युनिव्हर्सिटी मध्ये BAMS परीक्षेमध्ये पदवी प्राप्त केली त्याबद्दल त्यांचा सत्कार अतिग्रे विद्यामंदिर शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक स्टाफ यांचेमार्फत करण्यात आला यावेळी बोलताना डॉक्टर ऐश्वर्या पाटील यांनी सांगितले की मी या शाळेची विद्यार्थिनी आहे सदर शाळेने मला घडविण्याचा सिंहाचा वाटा आहे मुलींनी भरपूर अभ्यास करून या शाळेचे व आपले गावचे नावलौकिक करावे असे सांगण्यात आले व प्रथम प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना माझ्याकडून व माझ्या कुटुंबाकडून बक्षीस जाहीर करण्यात येथे डॉक्टर ऐश्वर्या पाटील यांना शिकवणारे मुख्याध्यापक शब्बीर जमादार सर उपस्थित होते , माझे आदर्श गुरू म्हणून ऐश्वर्या पाटील हिने सरांचा सत्कार केला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राजाराम कोठावळे सर यांनी केले व आभार तुकाराम माने सर यांनी मांडले यावेळी उपस्थित मुख्याध्यापक जाधव सर, पूनम परीट, सरिता रानगे ,वंदना पाटील, बडे मॅडम व सर्व अध्यापक उपस्थित होते