प्रेस मीडिया लाईव्ह :
अतिग्रे प्रतिनिधी : भरत शिंदे
ग्राहक हित संरक्षण महाराष्ट्र या संघटनेमार्फत माननीय जिल्हा पुरवठा तहसीलदार सुनीता नेरलीकर मॅडम यांना निवेदन देण्यात आले की कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्राधान्य कुटुंबांना आनंदाचा शिधा 95% आला आहे तो 100% सर्व कुटुंबांना मिळावा व काही रास्त दुकानांमध्ये शिधा जिन्नस संच 4 वस्तू पैकी तीन वस्तू आले आहेत तरी त्या चारीही वस्तू एकाच वेळी देऊन लाभार्थ्यांची गैरसोय होऊ नये व हा गणेश चतुर्थी निमित्त आनंदाचा शिधा हा सर्व कुटुंबाला मिळावा तरच सर्व लाभार्थी आनंदाने सण साजरा करतील यावेळी उपस्थित ग्राहक हित संरक्षण महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री जगदीश पाटील ,गणेश धामोडकर ,आप्पासाहेब कांबळे ,विनोद मुसळे, लालचंद पारिक, संजय अगरवाल ,श्रीधर पाटील ,प्रतीक बोराटे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते