प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- कोल्हापूर शहरात विविध ठिकाणी दहीहंडीचे आयोजन केले होते.विविध भागातील गोविंद पथकानी भाग घेऊन मोठ मोठी बक्षीसे पटकावलीत.तसेच दसरा चौक येथील धनंजय महाडीक युवा शक्तीची 3 लाखाची दहीहंडी गडहिग्लज येथील नेताजी पालकर गोविंद पथकाच्या प्रकाश मोरे या गोविंदाने दहीहंडी फोडून 3 लाखांच्या बक्षीसासह एकूण 3 लाख 91 हजाराचे मानकरी ठरले.
या गोविंदा पथकात गडहिग्लजसह शिरोळ,तासगाव ,कुरुंदवाड याही संघानी भाग घेतला होता.याही संघाना बक्षीसे देण्यात आली.यावेळी समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते श्रीकृष्ण प्रतिमेचे पूजन करून माजी आमदार महादेवराव महाडीक यांच्या हस्ते श्रीफळ वाढ़वून कार्यक्रमास सुरुवात झाली.यावेळी खा.धनंजय महाडीक ,राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.ही दहीहंडी पाहण्यास प्रचंड गर्दी झाली होती. शहरासह ग्रामीण भागातुन ही लोक आले होते.