प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर-आज शहरात आणि उपनगरात मोठ्या भक्तीमय वातावरणात "गणपती बाप्पा मोरया,पुढ़च्या वर्षी लवकर या"च्या गजरात पारंपारिक वाद्यांचा साहाय्याने किरकोळ वाद निवळता शांततेत पार पडली.मानाचा तुकाराम माळीच्या गणपतीची फुलांच्या सजविलेल्या पालखीची मान्यवरांच्या हस्ते पुजा आरती करून मिरवणुकीस सुरुवात झाली.या मिरवणूकीत केरळच्या वाद्याचे मोठे आकर्षण होते.हया गणपतीचे विसर्जन प्रथमच पंचगंगा नदीत न होता ईराणी खणीत विसर्जन करण्यात आले.कोल्हापूर पोलिसांनी सीसीटीव्ही द्वारे विसर्जन मंडळावर करडी नजर ठेवून होते.कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानेही स्वछता ठेवून वेळोवेळी कचरा उचलत होते.
ही मिरवणूक पहाटे पर्यंत चालू होती.किरकोळ वाद वगळता शांततेत मिरवणूक पार पडली.निवडणूक मार्गावर काही ठिकाणी लहान मुले आणि महिलासह चेंगराचेंगरी झाली होती.मिरवणुक मार्गावर पोलिस प्रशासनाने पोलिस बंदोबंदोबस्त चोख ठेवला होता.मिरवणूकीतील शेवटच्या गणपतीची पोलिस अधीक्षक श्री.महेंद्र पंडीत यांच्या हस्ते श्री ची आरती होऊन मिरवणूकीची सांगता झाली.