प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर-रत्नागिरी जिल्ह्यातील एका डॉक्टरला दिल्ली येथील लाचलुचपतचे अधिकारी असल्याचे सांगून त्यांचे अपहरण करून दहा लाखांची खंडणी मागणारयांना शाहुपुरी पोलिसांनी अटक केली.सुयोग कार्वेकर(मोरेवाडी),रविंद्र पाटील (वाशी नाका)आणि सुमित घोडके ( पाचगाव ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
ही कारवाई क.बावडा येथील प्रशासकीय इमारत जवळ सापळा लावुन शाहुपूरीचे पोलिस निरीक्षक अजयकुमार यांनी आणि त्यांच्या पथकाने केली.या तिघांच्या कडुन बनावट ओळखपत्र ,सरकारी अक्षराची नेमप्लेट आणि मोटार जप्त केली आहे.सुभाष डाक असे डॉक्टराचे नाव असून त्यांचा रत्नागिरी जिल्ह्यातील कणेर येथे दवाखाना आहे.यातील रविंद्र पाटील आपल्या दोघां सहकारी सोबत त्यांच्या दवाखान्यात गेले होते.आम्ही लाचलुचपतचे वरिष्ठ अधिकारी असून तुमच्या येथे गर्भ लिंग चाचणी होत असल्याची तक्रार आहे.असे सांगून त्यांना मोटारीत बसवून कागदपत्रांची मागणी करत हे प्रकरण मिटवायचे असेल तर दहा लाख रुपये द्यावे लागेल असं सांगून डॉक्टरांनी नकार दिला असता त्या नंतर या तिघांनी क.बावडा येथे प्रशासकीय इमारती जवळ थांबविले.तेव्हा डॉक्टरांनी आपल्या नातलंगाना याची फोन करून माहिती दिली अ सता त्यानी 112 नंबरवर या घटनेची माहिती दिली.काही वेळातच शाहुपुरीचे पोलिस घटना स्थळी दाखल होऊन त्या तिघां जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांचे बिंग फुटलं.