प्रेस मीडिया लाईव्ह :
अतिग्रे प्रतिनिधी : भरत शिंदे
अतिग्रे तालुका हातकणंगले येथे जय जवान जय किसान बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अतिग्रे व जवान तानाजी पाटील वाढदिवस उत्सव समिती अतिग्रे यांचे मार्फत औद्योगिक कुशल वर्ग सन्मान सोहळा पार पडला अतिग्रे गावातील औद्योगिक कर्मचारी वर्ग अतिशय परिश्रम घेऊन बलशाली भारत घडवत आहे त्या कुशल कामगारांचा येतोचित असा सन्मान मेजर तानाजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे संस्थेमार्फत करण्यात आला .
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री शीलवंत बिडकर यांनी मांडले या कार्यक्रमासाठी माजी आमदार राजीव आवळे, अध्यक्ष हातकणंगले तालुका काँग्रेस कमिटी माननीय भगवानराव जाधव ,हातकलंगले तालुका अध्यक्ष भाजप अमरसिंह पाटील ,आळते गावचे सरपंच अजिंक्य इंगवले ,मालेगावचे माजी सरपंच बंटी उर्फ प्रताप पाटील, अतिग्रे माजी सरपंच तानाजी पाटील ,आजी-माजी सैनिक संघटना अध्यक्ष धोंडीराम पाटील ,आत्माराम बिडकर सर ,दयानंद कांबळे, शितल खोत ,कुंदन आवळे ,धोंडीराम पाटील ,नामदेव पाटील या सर्व मान्यवरांचे स्वागत जवान तानाजी पाटील वाढदिवस उत्सव समिती यांचेमार्फत करण्यात आले तसेच आलेल्या सर्व मान्यवरांनी मेजर तानाजी पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी बोलताना माजी आमदार राजीव आवळे व आळते गावचे सरपंच अजिंक्य इंगवले यांनी कामगार वर्ग हा लक्ष्मी, पार्वती व हातकणंगले एमआयडीसी काम करतात त्यांना लागणाऱ्या सर्व सुविधा देण्याचे आश्वासन करण्यात आले
यावेळी उपस्थित तालुकाध्यक्ष आजी-माजी सैनिक सेवाभावी संस्था कोल्हापूर माननीय नितीन पाटील, चेअरमन जय जवान जय किसान संस्था अतिग्रे विजय पाटील, संदीप बिडकर ,आनंदा पाटील, सुरज पाटील ,संग्राम सिंह जाधव, अर्जुन कुंभार ,अभिजीत पाटील, शहाजी हेरले, व जय जवान जय किसान संस्थेचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते