प्रेस मीडिया लाईव्ह :
अतिग्रे प्रतिनिधी : भरत शिंदे
अतिग्रे तालुका हातकणंगले येथे आई फाउंडेशन अतिग्रे यांचे मार्फत पशुखाद्य व्यवस्थापन मार्गदर्शन व पशुविकास मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले. यावेळी कारगिल इंडिया (मिल्क जन पशुखाद्य ) चे डॉक्टर श्री रामकृष्ण पाटील व श्री किरण भोसले यांनी पशूंच्या तक्रारी बद्दल माहिती घेऊन निरसन केले
गाभण काळात जनावरांची घ्यावयाची काळजी ,वासरांचे संगोपन ,गोठा स्वच्छता ,दूध वाढ ,चाऱ्यांचे प्रमाण, यावर मार्गदर्शन करण्यात आले तत्पूर्वी आई फाउंडेशन अतिग्रे यांच्यामार्फत मागील झालेल्या शिबिरामध्ये गावातील 30 गोट्यांना भेटी देऊन सुमारे 150 जनावरांची तपासणी आणि उपचार करण्यात आले .
आई फाउंडेशन मार्फत शेतकऱ्यांना त्यांच्या पशुधनासाठी मोफत औषधे कॅल्शियम वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित कामधेनु दूध डेअरी चे चेअरमन श्री सचिन पाटील ,दीपक पाटील ,नामदेव वड्ड, अंकुश पाटील, शशिकांत पाटील, निवास पाटील, प्रशांत यादव ,प्रकाश परीट ,नचिकेत पाटील ,गावातील सर्व शेतकरी आई फौंडेशनचे निलेश पाटील ,संतोष गुरव ,विद्याधर लाटवडे कर ,सुशांत पाटील ,सर्व आई फाऊंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते