प्रेस मीडिया लाईव्ह :
विशेष प्रतिनिधी: संभाजी चौगुले
हेर्ले : कामधेनु पतसंस्था ही हेर्ले परिसरात विश्वासू संस्था म्हनुन नावारुपास आली आहे.गावामध्ये अनेक संस्था येऊनही संस्थेने 15 कोटींच्या ठेवी जमा केल्या असून सभासदांना 12%लाभांश जाहीर केला आहे,असे प्रतिपादन कामधेनु पतसंस्थेचे चेअरमन आदगोंडा पाटील यांनी केले.
हेरले येथील कामधेनु नागरी सहकारी पतसंस्थेच्या 31 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.पुढे बोलताना चेअरमन पाटील म्हणाले, संस्थेमध्ये सन२२-२३ या आर्थिक वर्षात १४ कोटी ५ लाख इतक्या ठेवी असून १ कोटी २८ लाख इतके फंड्स आहेत .गुंतवणूक ५ कोटी ८0 लाख असून ९ कोटी ३१ लाख इतकी कर्जे आहेत.संस्थेचा चालू आर्थिक वर्षात ढोबळ नफा हा २६ लाख २ हजार इतका झाला असून तरतुदी वजा करता निव्वळ नफा 10 लाख 15 हजार इतका आहे.संस्थेस ऑडिट वर्ग अ मिळाला असून सभासदांना १२% लाभांश देण्याचे ठरविण्यात आले आहे.
यावेळी गावातील सामाजिक,शैक्षणिक, इतर क्षेत्रात ऊल्लेखनीय कामगीरी केलेल्या व्यक्ती व ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार करण्यात आला . अहवाल वाचन सेक्रेटरी अभय शेटे यांनी केले.
सभेस केडीसीसी बँकेचे माजी संचालक विलास गाताडे, इंचलकरंजी मर्चंट बँकेचे व्हाईस चेअरमन गजानन लोंढे,संचालक चंद्रकांत बिदंगे, बाळासाहेब बरगाले, विजय कामत जनरल मॅनेजर दीपक काटकर ,चंद्रप्रभा विकास सोसायटीचे चेअरमन बालेचांद जमादार, हातकणंगले पंचायत समितीच्या माजी सभापती जयश्री कुरणे,संस्थेचे संचालक सर्जेराव भोसले, श्रीधर चौगुले, संजय उपाध्ये भुजगोंड पाटील, अभिनंदन परमाज, दादासो संकपाळ, भगवान कोळेकर ,गौतम कुरणे सुप्रिया चौगुले, अनिता कोरेगांवे,गोविंदा आवळे, रियाज जमादार अर्जुन पाटील ,अमोल पाटील, कामधेनू दुध संस्थेचे चेअरमन बाबासाहेब चौगुले,व्हाइस चेअरमन झाकीर देसाई, सुभाष जाधव, धोंडीराम कोळेकर , बाळगोंड पाटील, राहुल चौगुले ,विशाल परमाज, अरविंद कदम संस्थेचे माजी संचालक, कर्मचारी वर्ग व मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. संस्थेचे व्हाईस चेअरमन मिलिंद इंगळे यांनी आभार मानले.