प्रेस मीडिया लाईव्ह :
अतिग्रे प्रतिनिधी : भरत शिंदे
ग्राहक हित संरक्षण महाराष्ट्र त्यांच्या वतीने निवासी उप जिल्हाधिकारी माननीय श्री संजय तेली साहेब हे शासकीय अधिकारी पदावरती नियुक्त झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
आपण त्या शासकीय सेवेत कोल्हापूर या कार्यालयामध्ये निवासी उपजिल्हाधिकारी या पदी नियुक्त झाला आपणाकडून सदरच्या पदाला न्याय देऊन ग्राहकांच्या व जनतेच्या हिताचे काम आपणाकडून पार पडावे यासाठी सदिच्छा ग्राहक हित संरक्षण महाराष्ट्र राज्य यांच्याकडून प्रशासनास नेहमीच सहकार्य असते ग्राहकांच्या हिताचे प्रश्न नेहमीच प्रशासन दरबारी मांडले जातात आपणाकडून त्या संस्थेस जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी सहकार्य रहावे ही अपेक्षा व आपल्या शासकीय नियुक्त बद्दल हार्दिक अभिनंदन करण्यात आले
यावेळी उपस्थित ग्राहक हित संरक्षण महाराष्ट्र राज्याध्यक्ष श्री जगदीश पाटील ,गणेश धामोडकर, आप्पासाहेब कांबळे ,विनोद मुसळे, लालचंद पारिक ,संजय अग्रवाल ,श्रीधर पाटील ,प्रतीक बोराटे ,इत्यादी मान्यवर उपस्थित होते