प्रेस मीडिया लाईव्ह :
भरत शिंदे : अतिग्रे प्रतिनिधी
गुरुकुल विद्यालय चॊकाक (तालुका हातकणंगले) येथे' हाथी घोडा पालखी.. जय कन्हैया लाल की...' असा जयघोष, करत श्रीकृष्ण-राधा यांची विद्यार्थ्यांनी केलेली वेशभूषा, दहीहंडी फोडण्यासाठी बालगोपाळांकडून लावले जाणारे थर... अशा उत्साहाच्या वातावरणात गुरुकुल विद्यालयात दहीहंडी उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमात मुलांनी मनमुराद आनंद लुटला. याप्रसंगी भगवान श्रीकृष्णाचे पूजन करण्यात आले. व राधा कृष्णाची वेशभूषा करून शाळेतील विद्यार्थी दहीहंडी उत्सवात सहभागी होऊन विद्यालयापासून गावातील प्रमुख मार्गावरून बाल गोपालांनी आकर्षक वेशभूषा करून दिंडी काढण्यात आली. यावेळी गावातील नागरिकांनी बाल गोपालांचे कौतुक केले. यावेळी शाळेचे चेअरमन, डे. सरपंच श्री. प्रविण माळी, मुख्याध्यापक - सुतार सर, वदंना वरिंगे, रंजना माने, ज्योती पाटील,त्रिशाला पाटील, स्वाती चॊकाककर, वैशाली पाटील,पुजा भोपळे, आरती पाटील, स्वाती कोळी, तसेच कर्मचारी, विध्यार्थी उपस्थित होते.
अतिग्रे प्रतिनिधी भरत शिंदे