प्रेस मीडिया लाईव्ह :
हेरले /वार्ताहर
चोकाक (ता.हातकणंगले) येथे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अरुण व्हनाळे यांची बिनविरोध निवड झाली. परिवर्तन आघाडीचे प्रमुख श्री मनोहर पाटील व श्री अविनाश बनगे यांच्या मार्गदर्शनाखाली चोकाक ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रवीण माळी यांचा आघाडीने नेमून दिलेला कार्यकाळ पूर्ण होताच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त जागेच्या निवडीसाठी सरपंच सुनील चोकाककर यांनी ग्रामपंचायत सभागृहात विशेष सभा बोलावली होती.
यावेळी अरुण व्हनाळे एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली .यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवक श्री मुजावर हे होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य- प्रवीण माळी , प्रसाद भोपळे , हर्षद कांबळे , महावीर पाटील, सविता चव्हाण, सविता हलसवडे, शीतल ननावरे , रेश्मा माळगे , कुसुम माने , प्रणाली कांबळे, व नागरिक उपस्थित होते.