प्रेस मीडिया लाईव्ह :
विशेष प्रतिनिधी : संभाजी चौगुले :
हेर्ले : ) माले ता. हातकणंगले शाळेत आजी - आजोबा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.या उपक्रमात गावातील बहुसंख्य आजी - आजोबांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला .
यामध्ये प्रथमतःशाळेत आजी आजोबांचे झांज पथकाने स्वागत करण्यात आले. यानंतर आजी आजोबांचे नातू व नाती कडून पादय पूजन व औक्षण करण्यात आले .
आजी आजोबानी उखाणे व जीवनमुल्ये ,संस्कार , संस्कृती याबाबत सर्वाशी संवाद साधला. आजी आजोबा यांचा संगीत खुर्ची हा मनोरंजक कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये त्यांनी आपले वय विसरून अतिशय उत्कृष्ठ सहभाग नोंदवला. आजीनी झिम्मा फुगडी व गीतगायन असे पांरपारिक खेळ खेळून सहभाग नोंदविला. सर्वच कार्यक्रमामध्ये आजी आजोबांनी अतिशय उत्साही प्रतिसाद नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली .या कार्यक्रमामुळे आजी आजोबा यांच्यात समाधान दिसून आले.
कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता हेरले केंद्रप्रमुख आर. बी . पाटील, मुख्याध्यापक नाभिराज व्हनवाडे, जी. एस.पाटील ,दिपाली ढवळे, संजय अनुसे , राहूल पडदुणे ,शशिकांत उगलमुगले , अश्विनी कदम यांनी परिश्रम घेतले .
फोटो ओळ माले येथे आजी आजोबा दिनानिमीत पाद्य पूजन करताना नातू व नाती