जालना जिल्ह्य़ातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवरील लाठीमार हल्ल्याच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या तारदाळ बंदला गावकऱ्यांनी आपले सर्व व्यवहार बंद ठेवून शंभर टक्के प्रतिसाद दिला
प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी :श्रीकांत कांबळे
जालना जिल्ह्य़ातील अंतरवाली सराटी या गावी संवैधानिक मार्गाने मराठा आरक्षणासाठी आंदोलन करीत असलेल्या आंदोलनकर्त्यांवर लाठीमार केल्याच्या निषेधार्थ तारदाळ मधील मराठा समाज, गावातील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ यांनी तारदाळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एकत्रितपणे येऊन प्रशासनाचा निषेध नोंदवित संताप व्यक्त केला.
तसेच संबंधित पोलीस अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली तसेच मंगळवारी तारदाळ गाव बंदचे आवाहन करण्यात आले
यावेळी तारदाळ येथील सर्व नागरिकांनी; व्यावसायिकांनी पानपट्टी , किराणा दुकान ; हॉटेल, बेकरी वगैरे आपले सर्व व्यवहार बंद ठेवून बंदला शंभर टक्के उत्स्फूर्त प्रतिसाद दिला . तसेच शहापूर पोलीस स्टेशनचे वतीने बंदोबस्त ठेवला होता.