प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- जादा परताव्या आमिषाने गुतवणुकदारांची ए.एस.ट्रेडिंगच्या द्वारा दीड हजार कोटीची फ़सवणूक केल्याची कबुली लोहीतसिंग सुभेदार यांनी दिली आहे.त्याला अटक केली असून चौकशी करत असताना ही माहिती समोर आली आहे.
न्यायालयाने त्याला 26 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.लोहीतसिंगची मोठी उलाढ़ाल पाहून काही जणांनी खंडणी गोळा केल्याची माहिती मिळाली आहे.यातील काही जणांना यापूर्वीच पोलिसांनी अटक केली आहे.लोहीतसिंग हा मुख्य म्होरक्या असून तो फरारी होता.तो वाशी येथुन ट्रकने बेळगाव जात असल्याची माहिती आर्थिक गुन्हें शाखेला मिळाली अ सताना आर्थिक गुन्हें शाखेच्या पोलिस निरीक्षक स्वाती गायकवाड यांनी आपल्या पथकासह किणी टोल नाका येथे सापळा रचून लोहीतसिंगला ताब्यात घेऊन अटक केली.ही कारवाई पोलिस अधीक्षक श्री.महेंद्र पंडीत,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई,उपअधीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक स्वाती गायकवाड यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.