प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- : कोल्हापुरातील एका व्यावसायिकांने जीएसटी चा कर न भरल्यामुळे त्याच्यावर कारवाई न करण्यासाठी त्या व्यावसायिकांकडे 10 हजारांची लाचेची मागणी करत ती स्विकारताना जीएसटी विभागातील कर निरीक्षकाला लाचलुचपतच्या पथकाने रंगेहात पकडून अटक केली.विशाल बाबू हापटे (रा.हातकंणगले).असे कारवाई झालेल्या कर निरीक्षकांचे नाव आहे.ही कारवाई लाचलुचपतच्या पथकाने आज दुपारी क.बावडा येथे केली . ही कारवाई लाचलुचपतचे सरदार नाळे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.