प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर : कोल्हापूर शहरात रेकी करून दुचाकी मोटार सायकली चोरणाऱ्या कर्नाटकातील निपाणी येथे रहात असलेल्या दोघां सख्या भावांना शाहुपुरी पोलिसांनी अटक करून त्यांच्या कडील पाच दुचाकी मोटारसायकलीसह सोन्याचे दागिने असा एकूण साडेतीन लाख रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.अशरफअली शेअरअली नगारजी (19)आणि सैफअली शेअरअली नगारजी (23 ,रा.दर्गा गल्ली,निपाणी)अशी अटक केलेलया दोघां सख्या भावांची नावे आहेत.
कोल्हापूर शहरातील सदर बाजार परिसरात भाड्याने खोली घेऊन त्यांच्या आणखी साथीदारासह रेकी करून चोरी करीत होते.या दोघां भावावर निपाणी पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल असून ते जामीनावर बाहेर येऊन आपल्या साथीदारासह कोल्हापुरात येऊन मोटार सायकली चोरी करीत होते.लवकरच त्यांच्या साथीदारांना अटक केली जाणार असल्याचे शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांनी सांगितले.ही कारवाई शाहुपुरीचे पोलिस निरीक्षक अजय सिंदकर ,सहा.पोलिस निरिक्षक प्रमोद जाधव यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.