प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- जादा परताव्याच्या आमिषाने फसवणूक ए.एस.ट्रेडिंग कंपनीच्या कर सल्लागार म्हणून काम करीत असलेले साहेबराव सुबराव शेळके (रा.नवीन वाशी नाका ,कोल्हापूर) यांना आर्थिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने अटक केली.या कंपनीचा मुख्य आरोपी लोहीतसिंग सुभेदार यांने ए.एस.ट्रेडिंग कंपनी स्थापन करून काही संचालकांची नेमणूक करून यांच्या मदतीने नागरिकांची जादा परताव्याच्या आमिषाने कोट्यावधी रुपयांची फसवणूक केली होती.
या बाबत शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील काही संचालकांना या अगोदरच अटक केली आहे.या गुन्हयांतील आरोपी अभिजीत साहेबरा शेळके याला यापूर्वीच अटक केली असून आता त्याचे वडील साहेबराव सुबराव शेळके हे या कंपनीत कर सल्लागार म्हणून काम करीत असून त्यानी तीन ते साडे तीन कोटी रुपये कमीशन पोटी मिळवल्याचे पोलिस तपासात उघडकीस आल्याने त्याना आज अटक करण्यात आली.ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत,पोलिस उपअधीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक स्वाती गायकवाड,पोलिस उपनिरीक्षक दिलीप कांरडे ,स.फौ.राजू वरक ,दिनेश उंडाळे आणि पो.ह.दिपक सावंत यांनी केली.या कंपनीत फसवणूक झालेल्या नागरिकांनी पोलिस अधीक्षक कार्यालय येथे आर्थिक गुन्हें शाखा ,तिसरा मजला कोल्हापुर येथे संपर्क साधण्याचे आवाहन आर्थिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने केले आहे.