पोलिस असल्याची बतावणी करून लुटणाऱ्या टोळीला अटक.

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे : 

कोल्हापूर-पोलिस असल्याची बतावणी करून लुटणारया इराणी टोळीतील तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक करून त्यांच्या कडील 24 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.बागरअली अहमदअली ,मुजाहीदअली मिस्किलअली आणि गुलामअली इराणी अशी अटक केलेल्याची नावे आहेत.यातील चौथा आरोपी फ़रार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

अधिक माहिती अशी की,कागल येथील  भाऊसो जगदाळे हे देवदर्शन घेऊन घरी जात असताना  मोटरसायकल वरुन पाठि मागून  येणारयां दोघां जणांनी जगदाळे यांना अडवून त्याना मारहाण करून त्यांच्या कडील सोन्याचे दागिने आणि रोख एक लाख पन्नास हजार रुपये असा मिळून चोवीस लाखांचा मुद्देमाल घेऊन पलायन केले होते.याची तक्रार कागल पोलिस ठाण्यात झाली होती.असाच प्रकार हुपरी येथे ही घडला होता याची ही तक्रार हुपरी पोलिसांत झाली होती.या गुन्हयांचा तपास करीत असताना हा प्रकार पोलिस रेकॉर्ड वरील बागरअली याने केल्याची माहिती मिळाली अ सता त्याला वाहतूक शाखेच्या बाबासो कोळेकर यांच्या मदतीने स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सापळा रचून बागरअली याच्यासह तिघांना अटक केली.ही कारवाई पोलिस अधीक्षक श्री.महेंद्र पंडीत अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक श्री.महादेव वाघमोडे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.

Post a Comment

Previous Post Next Post