प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - कोडोली येथे गणेशमुर्तीची विसर्जनच्या मिरवणूकीत फटाके फोडताना भरत चव्हाण (रा.देवाळे ,सध्या कोडोली).हा तेथील भगतसिंग मंडळाचा कार्यकर्ता असून काल गणपती विसर्जन मिरवणूक चालू असताना हा फटाका लावीत होता .त्या वेळी फटाका का फुटला नाही म्हणुन वाकून पहात असताना तो फटाका अचानक फुटल्याने त्याच्या डोळ्याला गंभीररित्या इजा झाली असून त्याला पुढ़ील उपचारा साठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.त्याचा जबाब घेऊन संबंधीतावर योग्य ती कारवाई करणार असल्याचे कोडोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्री.शितलकुमार डोईजड यांनी सांगितले.पुढ़ील तपास चालू आहे.
Tags
कोल्हापूर