प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर-पत्रकार आणि छायाचित्रकार यांच्यावर वारंवार होणारया हल्ल्याच्या निषेधार्थ आज कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.प्रथम शाहू समाधी स्थळाच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन पेन,बूमर आणि फोटोग्राफी चरणी ठेवून वंदन करण्यात आले.त्या नंतर "एक पत्रकार लाख पत्रकार "पत्रकारांवरील दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्या "आणि "पत्रकार एकजुटीचा विजय असो अशा घोषणा देत आंदोलन करण्यात आले.
पत्रकार हा आपले काम प्रामाणिक पणे थंडी ,ऊन,वारा ,पाऊस याची कशाचीही पर्वा न करता काम करीत असतो.पण काही धनदांडग्यांच्या कडुन पत्रकार आणि छायाचित्रकार यांच्यावर वारंवार हल्ले होत आहेत.काही जण संपादकांची मुस्कटदाबी करीत आहेत.यांच्यावर वेळीच आळा बसला पाहीजे आणि पत्रकारांचे विवीध प्रश्न मार्गी लागण्याची मागणी ही प्रेस क्लबचे अध्यक्ष शितल धनवडे यांनी या वेळी केली.या वेळी पत्रकारांना पाठिबा देण्यासाठी आ.ऋतुराज पाटील यांना ही आंदोलन स्थळी येऊन पत्रकारांचे प्रश्न अधिवेशनात मांडण्याचे आश्वासन दिले आहे.यावेळी आ.जयश्रीताई जाधव ,ठाकरे गटाचे संजय पवार यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी ,सामाजिक कार्यकर्ते तसेच वृत्तपत्र संघटनेचे पदाधिकारी सर्व दैनिकांचे पत्रकार छायाचित्रकार ,प्रिंट मिडीया आणि इलेकट्रॉनिक मिडीयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.