गोवा बनावटीची दारुची वाहतुक करणारयांस अटक करून साडेचोवीस लाखांचा मुद्देमाल जप्त.



प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे : 

कोल्हापुर -करवीर तालुक्यातिल नंदगाव -गिरगाव रोडवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने सापळा रचून एक महागडी कार पकडुन यातील सहा लाखांचे वेगवेगळ्या कंपनीचे गोवा बनावटीची दारु पकडुन महागड्या कारसह साडेचोवीस किंमतीचा मुद्देमाल जप्त करून गजानन दिनकर पाटील (वय47रा.रुईकर कॉलनी) यास अटक केली.

या पथकाला गोव्यातुन दारु वहातुकीची माहिती मिळाली अ सता त्या परिसरात सापळा रचून गोवा पासिंगची असणारी जीप येताना दिसली चालकाला थांबवून जीपची तपासणी केली असता वरिल माल मिळून आला.ही कारवाई विभागीय उपआयुक्त व्ही.पी.चिंचाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पंकज कुंभार ,एस.एस.गोंदकर यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.

Post a Comment

Previous Post Next Post