गणेशोत्सव आणि इद-मिलाद या उत्सव काळात चोख बंदोबस्त ठेवावा . पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत .

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे : 

कोल्हापुर-गणेशोत्सव आणि ईद -मिलाद च्या पाश्वभुमीवर पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी जिल्हयातील सर्व पोलिस अधिकारी यांची आढ़ावा बैठक घेऊन विवीध सूचना दिल्या.प्रथम मा.पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी विवीध गुन्हें उघकीस आणुन  चांगली कामगिरी करण्यारया अधिकारी आणि कर्मचारी अशा 151 जणांना  प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले .तसेच प्रलंबीत प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावण्याचा सूचना देऊन या उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घेऊन सोशल मिडीया आणि आक्षेपार्ह स्टेटस ठेवणारयावर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या.या काळात जादा पोलिसांची संख्या वाढवून चोख बंदोबस्त ठेवण्यात यावा .

गेल्या वर्षी दोन मंडळात वाद होऊन मिरवणूकीत अडथळा झाला होता अशाच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून शांतता समितीची बैठक घेण्याच्या ही सूचना केल्या.या बैठकीस अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई,सर्व उपविभागीय अधिकारी,जिल्हयातील सर्व पोलिस अधिकारी आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post