कोल्हापूर, सांगलीत दोन महिन्यात 13 हजार 517 ग्राहकांना नवीन वीजजोडणी



प्रेस मीडिया लाईव्ह : 

विशेष प्रतिनिधी :  संभाजी चौगुले 

कोल्हापूर परिमंडळ: महावितरणकडून ग्राहकांना जलद गतीने नवीन वीजजोडणी सेवा उपलब्ध करून दिली जाते आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यात विक्रमी 13 हजार 517 ग्राहकांना नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे. त्यातील 213 ग्राहकांना अर्ज केल्यांनतर तर 1232 ग्राहकांना पैसे भरल्यानंतर 24 तासाच्या आत तत्काळ नवीन वीजजोडणी देण्यात आलेली आहे. महावितरणच्या गतिमान सेवेबद्दल ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे.

  महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मा.श्री.लोकेश चंद्र यांनी ग्राहकाभिमुख प्रशासन राबविताना ग्राहकसेवा गतिमान करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार महावितरणच्या कोल्हापूर परिमंडळातील कोल्हापूर जिल्ह्यात दोन महिन्यात 7 हजार 664 ग्राहकांना नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे. त्यातील 161 ग्राहकांना अर्ज केल्यांनतर तर 581  ग्राहकांना पैसे भरल्यानंतर 24 तासाच्या आत तत्काळ नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यात दोन महिन्यात 5 हजार 853  ग्राहकांना नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे. त्यातील 52 ग्राहकांना अर्ज केल्यांनतर तर 651  ग्राहकांना पैसे भरल्यानंतर 24 तासाच्या आत तत्काळ नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात दोन महिन्यात घरगुती 5605, वाणिज्य 1173, औद्योगिक 280, कृषी 437 व इतर वर्गवारीत 169 नवीन वीजजोडण्या दिल्या आहेत. सांगली जिल्ह्यात दोन महिन्यात घरगुती 3715, वाणिज्य 739, औद्योगिक 79, कृषी 1145 व इतर वर्गवारीत 175 नवीन वीजजोडण्या दिल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील 161 ग्राहकांना तर सांगली जिल्ह्यातील 52 ग्राहकांना अर्ज केल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी व स्थळपाहणी, ग्राहकांकडून विहित शुल्क भरणा ही सर्व प्रक्रिया 24 तासाच्या आत पुर्ण करून नवीन वीज जोडणी देण्यात आली

Post a Comment

Previous Post Next Post