प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर-क.बावडा येथे पूर्वीच्या वादातुन 10 ते 15 जणांनी सशस्त्र हल्ला करून सुरज कांबळे आणि वैभव माजगावकर यांनी गंभीररित्या जखमी करून पलायन केले.जखमींना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या प्रकरणी शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक माहिती अशी की.कं बावडा येथे आंबेडकर बगीचा असून येथे मंडप कामगार सुरेश कांबळे उभा होता.या वेळी विरोधी गटातील वेदांत राजवर्धन,अनिल कांबळे,गब्बर ,आणि अनिकेत सूर्यवंशी यांच्यासह सदरबझार येथील काही तरुण हातात शस्त्रे घेऊन सुरज कांबळे यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यात सुरज गंभीर जखमी झाला.त्याला सोडायला वैभव माजगावकर गेला असता त्याच्यावरही हल्ला केला या हल्ल्यात वैभवही जखमी झाला.या वेळी परिसरातील नागरिक जमा झाल्याने हल्लेखोर पसार झाले.सुरज यांच्यावर 5 ते 6वार झाले आहेत.तर त्याला वाचवायला गेलेला वैभववर दोन ते तीन वार केले आहेत.या घटनेची नोंद घेऊन शाहुपूरीचे पोलिस निरीक्षक अजय सिंदकर कर्मचारीसह घटना स्थळी आणि सीपीआर येथे जाऊन माहिती घेऊन संशयीतांना पकडण्यासाठी पोलिस रवाना झाले.या घटनेची नोंद शाहुपुरी पोलिस ठाण्यात झाली आहे.