प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर-भारतीय स्टेट बँक आणि समृध्दी महिला संस्थेच्या वतीने बचत गटाच्या महिलांचा मेळावा आयोजित केला होता.या वेळी वरिष्ठ अधिकारी धिरज हिरे भारतीय स्टेट बँकेचे मार्केट यार्ड शाखा अधिकारी पंकज कुमार सर डीप्यूटी मॅनेजर सुरेखा कणसे पाटील मॅडम यांच्यासह इतर अधिकारी वर्ग आणि महात्मा फुले समताचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करून जेष्ठ विचारवंत प्रा.हरी नरके यांना आंदराजंली वाहण्यात आली.
सदरच्या मेळाव्यास विविध बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.या वेळी समता परिषदेच्या शहराध्यक्ष यांनी मार्गदर्शन करून महिला बचत गटानी फायनान्स बचत गटा पेक्षा शासकीय गटात सामील होण्याचे आवाहन धिरज हिरे यांनी करून महिलांना कल्याणकारी योजनांची माहिती दिली.महिला बचत गटाच्या पाठीशी कायमपणे सोबत राहून बचत गटाच्या महिलांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता सरकारी योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन केले.यात महिलांचे मोठे योगदान असून सामाजिक आणि आर्थिक स्तर सुधारायचा असेल तर बचत गट ही वाढ़ला पाहीजे.
या वेळी अंधश्रद्धा निर्मूलनच्या सीमा पाटील यांनी श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक समजावून यावेळी प्रबोधनात्मक गाणी म्हणत उपस्थितांचे मंनोरंजन केले.तसेच उपस्थितीत अधिकारी यांनीही बचत गटाच्या योजनाची माहिती दिली.
या वेळी उपस्थित महिलांनी मान्यवरांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली.यावेळी कार्याध्यक्ष दादासाहेब चोपडे ,सामाजिक कार्यकर्त्या स्वाती काळे,भारती कांबळे,संगीता बनगे आणि इतर महिलांच्या योगदानातुन हा कार्यक्रम पार पडला. या वेळी संविधान प्रतिमेचे वाचन करण्यात आले.