प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर -कोल्हापुरात गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनाने गणेशोत्सवात विघ्नं आणण्याच्या शक्यता असल्येल्या रेकॉर्ड वरील 191 जणांना हद्दपार करून शहरात प्रवेश करण्याची मनाई केली आहे.यामध्ये लक्ष्मीपुरी पोलिसांनी 37 जणांना, जुना राजवाडा पोलिसांनी 105 जणांवर ,करवीर पोलिसांनी 26 आणि राजारामपुरी पोलिसांनी 23 जणांवर अशा एकूण 191जणांवर हद्दपारीची कारवाई केली आहे
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक श्री.महेंद्र पंडीत अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई,उपविभागीय अधिकारी शहर विभाग श्री.अजित टिके तसेच करवीरचे विभागीय अधिकारी संकेत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मीपुरीचे पोलिस निरीक्षक अविनाश कवठेकर .करवीरचे पोलिस निरीक्षक अरविंद नाळे , राजारामपुरीचे पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे ,आणि जुनाराजवाडाचे पोलिस निरीक्षक सतीश गुरव यांच्यासह त्यांच्या सहकारयांनी केली.