जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठीच सत्तेत सहभागी-अजित पवार.



प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे : 

कोल्हापुर- लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील तर हातात सत्ता पाहिजे या साठीच आम्ही सत्तेत सहभागी झालो असल्याचे सांगितले.आता विरोधक आमच्यावर टीका करत आहेत.आमच्यावर दबाव असल्याची टिका करत होते  आणि खरोखरच आमच्यावर दबाव होता. 

आम्ही गेलेल्या आमदारांनी सह्या करून देवेंद्र फडणवीस यांना पाठींबा देण्यासाठी पत्र लिहून सह्या केल्या होत्या.आणि मी जर खोटे बोलत असेन तर मी राजकारण सोडायला तयार आहे.आणि खरे असेल तर त्यांनी राजकारणातुन निवृत्त व्हावे असे आव्हान शरद पवार यांचे नांव न घेता अजित पवार यांनी केले.यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे ,वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह मंत्री छगन भुजबळ,धनंजय मुंडे,अनिल पाटील आदी उपस्थित होते.या सभेला मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच पोलिस प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था चोख ठेवली होती.

Post a Comment

Previous Post Next Post