कोल्हापूर जिल्हा बहुजन माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्था मर्यादीत कोल्हापूर यापतसंस्थची २७ वी वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

विशेष प्रतिनिधी :  संभाजी चौगुले : 

 कोल्हापूर जिल्हा बहुजन पतसंस्थेची सभा महालक्ष्मी हॉल कोल्हापूर येथे अध्यक्ष मा रघुनाथ मांडरे यांच्या अध्यक्षेतेखाली संपन्न झाली . स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष रघुनाथ मांडरे यांनी केले . कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन राहूल मानगावकर , प्रकाश पोवार ' नंदकुमार कांबळे , सुजाता भास्कर , सुजाता देसाई यांच्या हस्ते झाले फोटो पूजन रविंद्र मोरे , दिलीप वायदंडे , विलास दुगार्डे , संजय कांबळे , विकास कांबळे , योगेश वराळे यांच्या हस्ते झाले .

 अहवाल सालात दिवगत सभासदाना श्रध्दांजली वाहण्यात आली .   संस्थेचे व्यवस्थापक बाबुराव साळोखे यांनी अहवालाचे रितसर पानकमांकानुसार वाचन केल्यानंतर काही सभासदानी विचारलेल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे संस्थेचे अध्यक्ष रघुनाथ मांडरे यांनी दिली सभेच्या दरम्यान सभासदाकडून आलेल्या सुचनांचे स्वागत करून त्याची पूर्तता संचलकांच्या परवानगीने करण्याचे अभिवचन दिले .

 सभेत बोलताना मा अध्यक्ष यांनी सन २०२२ / 23 या अहवाल काळात सभासद संख्या १८५४ असून भाग भांडवल २३१ ९० ५ ७ ० कोटी इतके असून २९७ ३१३ ३ ५५ कोटी इतक्या ठेवी संस्थेकडे असल्याचे जाहिर केले . या सालात सभासंदासाठी कर्जचा व्याज दर १ % कमी असून सभासदासाठी १५ % डेव्हिडंड दिला आहे . दिपावली भेट देण्याचे मान्य केले . सभासदाच्या हिताचे योग्य निर्णय संस्थेकडून घेतले जात असून यापुढेही सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले जातील आसे अश्वासन दिले या प्रंसगी अधक्ष रघुनाथ मांडरे , उपाध्यक्ष विकास कांबळे , संचालक राहुल मानगांवकर प्रकाश पोवार , नंदकुमार कांबळे , रविंद्र मोर , दिलीप वायदंडे , संजय कांबळे , रघुनाथ कांबळे ' योगेश वराळे , बापू कांबळ , दतात्रय टिपुगडे , विलास दुर्गाडे , सुजाता भास्कर' सुजाता देसाई , अण्णा पाटील , व्यवस्थापक बाबुराव साळोखे संस्थेचे सर्व कर्मचारी सभासद बंधु भगिनी उपस्थीत होते , आभार संस्थेचे उपाध्यक्ष विकास कांबळे यांनी मांडले सुत्रसंचलन श्री लवटे यांनी केले . व सभा संपल्याचे जाहिर केले

Post a Comment

Previous Post Next Post