प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर ता.30 : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्याकरीता देशाचे पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी दिनांक 1 ऑक्टोंबर 2023 रोजी स्वच्छतेकरीता सर्व नागरीकांनी 1 तास श्रमदान करावे असे आवाहन केले आहे. त्याअनुषंगाने दि. 1 ऑक्टोंबर 2023 रोजी स्वच्छता पंधरवडा-स्वच्छता ही सेवा (SHS) 2023 अंतर्गत देशभरात स्वच्छता मेगा ड्राईव्हचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये शहरातील विविध शैक्षणिक संस्था, युवा क्लब, NCC, NSS, नागरिक इत्यादिंना सहभागी करून घेऊन दिनांक 01 ऑक्टोंबर 2023 रोजी शहरातील विविध ठिकाणी स्वच्छता मोहिम आणि नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी श्रमदान, प्लॉगेथॉन ड्राइव्ह इ. उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
यामध्ये शहरात सकाळी 10 ते 11 या वेळेत महालक्ष्मी मंदिर परिसर, रेल्वे स्टेशन, टेंबलाई मंदीर परिसर, तोरस्कर चौक मेन रोड, पाडळकर मार्केट परिसर, विकास हायस्कूल रोड, आयटीआय रोड, क्रीडा संकूल रोड, सायबर कॉलेज रोड, यादवनगर, सदरबाजार मेनरोड, शिये फाटा मेनरोड, क्रांतिसिंह नाना पाटील नगर मार्केट रोड, शिरोली जकात नाका ते तावडे हॉटेल मेनरोड, पंचगंगा नदीघाट परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.
याव्यतिरिक्त नागरिकांना आपल्या सोयीनुसार ज्या ठिकाणी स्वच्छता मोहिम राबवायची असल्यास त्या ठिकाणी नागरिक स्वच्छता मोहिम राबवू शकतात व त्याबाबत https;//swachhatahiseva.com या संकेतस्थळावर माहिती अपलोड करू शकतात. तरी शहरातील सर्व नागरीक, तरुण मंडळे, सेवाभावी संस्था यांनी महानगरपालिकेअंतर्गत सुरु असलेल्या स्वच्छता उपक्रमात आपल्या जवळच्या परिसरात स्वच्छता मोहीमेमध्ये आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.