प्रेस मीडिया लाईव्ह :
विशेष प्रतिनिधी- संभाजी चौगुले.
कोल्हापूर : शालेय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत सिकई क्रीडा प्रकारात श्रीमती इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कालेज ऑफ आर्टस् अँड सायन्स, पेठ वडगाव. यश प्रथम क्रमांक कुमारी वेदिका पाटील हिची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी विद्यार्थीनींची निवड
क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या सिकई स्पर्धेत श्रीमती इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर काॅलेज ऑफ आर्टस् सायन्स, पेठ वडगांव मधील १७ वर्षांखालील विद्यार्थीनी वेदिका पाटील हिने प्रथम क्रमांक मिळवला तीची सांगली येथे विभागीय स्पर्धेसाठी निवड तसेच समिक्षा पाटील द्दितीय,आरती कुंभार हिने तृत्तीय क्रमांक मिळवल्या बद्दल विद्यार्थ्यीनीचे अभिनंदन व शुभेच्छा कार्यक्रम शाळेच्या प्रागंणात पार पडला.
यशस्वी खेळाडूंना संस्थेचे अध्यक्ष मा.श्री विजयसिंह माने, कार्याध्यक्ष मा.श्री विकासराव माने,मा. सौ.मनिषा माने ,जिल्हा परिषद सदस्या कोल्हापूर, प्राचार्य डॉ. सचिन कोंडेकर सर यांचे प्रोत्साहन लाभले.
क्रीडा शिक्षक श्री. हरिश्चंद्र गायकवाड सर , श्री. शामराव पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले तसेच सर्व शिक्षक वृंद,पालक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.