शिवाजी चौकात दोन गटात गणेश मुर्ती बसविण्यावरुन वाद , क्षीरसागर आणि इंगवले समोरासमोर.

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर-गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री शिंदे गट आणि उध्दव ठाकरे गटात शिवाजी पुतळा येथे गणेशमुर्ती बसविण्यावरुन वाद चालू आहे.शिंदे गटाचे कपिल केसरकर यांनी तेथे गणेशमुर्तीची बसविली.मात्र आम्हीही येथेच गणपती बाप्पाची बसविणार अशी भूमिका उध्दव ठाकरे गटाने घेतली .यातील एका गटाने शिवाजी चौक तर दुसरया गटाने बिंदु चौकात ठिय्या मारला.यातुन वातावरण बिघडुन तणाव निर्माण झाला.

पोलिस प्रशासनाने मध्यस्थी करत शिवाजी चौकात थोड्या अंतरावर दुसरा मंडप उभारुन ठाकरे गटाच्या गणेश मुर्तीची बसविल्यामुळे तणाव कमी झाला.शिवाजी चौकात 23 वर्षा पासून शिवसेनेच्या वतीने बसविली जाते यंदा प्रथमच हा पक्षात दोन गट पडल्यामुळे वाद निर्माण झाला.या मंडळाचे अध्यक्ष कागदोपत्री कपिल केसरकर यांचे नाव असल्याने त्यानी महापालिका आणि पोलिस   प्रशासनाकडून परवानगी घेतली आहे.याच मंडपात आम्हीही गणेशाचीमुर्ती बसविणार म्हणत अशी भूमिका उध्दव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यानी घेतली.गुरुवारी सकाळी पालखीत बसवून वाजत गाजत जाण्याचे नियोजन केले.या दोन्ही गटात वाद होऊन मारामारी होणार म्हणुन दोन्ही गटाच्य पदाधिकारयांना पोलिस अधीक्षक कार्यालयात बोलावून पोलिसांनी तीन पर्यायी जागा सांगून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला पण दोन्ही गटानी नकार दिला.त्यामुळे  उध्दव ठाकरे गटाचे कार्यकर्ते बिंदु चौकात जमा झाले.

यानंतर शिंदे गटाचे क्षीरसागर शिवाजी चौकात आले असता पोलिस प्रशासनाने त्यांना दोन्ही बाजूंनी तणाव आहे.योग्य भूमिका घ्या असे सांगितले त्यानंतर दोन मंडळ सोडुन दुसरा मंडप घालण्यास परवानगी दिली. यानंतर उध्दव ठाकरे गटाचे कोल्हापूर जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी राज्य शासन आणि पोलिस प्रशासनाने त्या व्यक्तीचा बंदोबस्त करावा.अशी प्रतिक्रीया दिली तसेच राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष क्षीरसागर यांनी आम्ही शांत घेतोय याचा अर्थ आम्ही बांगड्या भरल्या नाहीत.अंगावर आले तर शिंगावर घेतले जाईल असे सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post