प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर-पुलाची शिरोली येथील अल्पवयीन प्रेमीयुगुलानी प्रेम करीत असताना कोणतीही जात पात न मानता प्रेम करा असा संदेश देत या दोघांनी दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.या घटनेने त्या परिसरात मोठी खळबळ माजली आहे.
अरबाज शब्बीर पखाली (वय 18)आणि सानिका नानासो निकम (वय 16)अशी या दोघांची नावे आहेत.या दोघांचे वडील एकमेकांचे चांगले मित्र असल्याचे समजते.त्या त्याचे येणे जाणे असल्याने त्यांचे प्रेमात रुपातंर झाले.याची दोघांच्या घरी चाहुल लागताच त्यांना विरोध होऊ लागला.त्यामुळे या दोघांनी आज सकाळी या दोघांचे मृतदेह गळफास लावून घेतलेल्या स्थितीत त्याच्या नातेवाईकांना आढ़ळून आले.या दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणी साठी सीपीआर रुग्णालयात आणले असता त्यांच्या नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती.या घटनेची नोंद पु.शिरोली पोलिस ठाण्यात झाली असून अधिक तपास तेथील पोलिस करीत आहेत.