नूतन मुख्याध्यापकांचा सत्कार समारंभ संपन्न
प्रेस मीडिया लाईव्ह :
विशेष प्रतिनिधी : संभाजी चौगुले:
मुख्याध्यापक म्हणून मिळालेल्या संधीचा उपयोग विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी व शाळा विकासासाठी करावा असे आवाहन करुन कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे कार्य व सक्षम संघटन राज्यात आदर्शवत आहे. संघाने नूतन मुख्याध्यापकांसाठी एकदिवसीय कार्यशाळा घ्यावी, असे प्रतिपादन पुणे विभाग शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी केले.
विद्याभवन, कोल्हापूर येथे कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने जिल्ह्यातील नूतन मुख्याध्यापकांचा सत्कार समारंभप्रसंगी आमदार जयंत आसगावकर बोलत होते. अध्यक्षस्थानी डी.बी.पाटील शैक्षणिक विचार मंचचे अध्यक्ष श्री.व्ही.जी.पोवार होते. यावेळी शिक्षणाधिकारी (माध्य.) डॉ.श्री.एकनाथ आंबोकर यांचे प्रमुख मार्गदर्शन झाले.
यावेळी बोलताना आमदार जयंत आसगावकर म्हणाले, बहुजन समाजाच्या शैक्षणिक विकासाआड येणाऱ्या धोरणाला विरोध करण्यासाठी सर्वांनी एकदिलाने प्रयत्न करुया. मुख्याध्यापकांनी संस्थाचालक, शिक्षक, कर्मचारी, पालक व विद्यार्थी यांचा समन्वयक म्हणून काम करावे.
शिक्षणाधिकारी (माध्य.) डॉ.श्री.एकनाथ आंबोकर म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणामुळे मुख्याध्यापकांची
जबाबदारी वाढली असून मुख्याध्यापकांनी अपडेट, टेक्नो सेव्ही असायला हवे. प्रत्येकाने शासन निर्णयाचा अभ्यास करावा.
आपले कर्तव्य, जबाबदाऱ्या पार पाडव्यात. मुख्याध्यापक संघाकडून गुणवत्ता वाढीसाठी सकारात्मक प्रयत्न होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
अध्यक्षस्थानावरुन बोलताना स्व.डी.बी.पाटील शैक्षणिक विचार मंचचे अध्यक्ष श्री.व्ही.जी.पोवार म्हणाले, आजच्या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व संघटनांचे प्रमुख मतभेद बाजूला ठेऊन उपस्थित आहेत. जिल्ह्यातील शैक्षणिक वातावरण सकारात्मक ठेवण्यासाठी याचा निश्चित उपयोग होईल. आपण स्व.डी.बी.पाटील आणि स्व.डी.डी.आसगावकर यांच्या विचाराने वाटचाल करूया.
शिक्षक भारतीचे पुणे विभाग अध्यक्ष श्री.दादासाहेब लाड म्हणाले, मुख्याध्यापकांनी संस्था व स्टाफ यामधील दुवा म्हणून काम करावे. मुख्याध्यापक संघाचे कार्य आदर्शवत असून संघाच्या वाटचालीत स्व.डी.बी.पाटील यांचे योगदान महत्वाचे आहे.
यावेळी मुख्याध्यापक संघाचे माजी चेअरमन श्री.बी.जी.काटे, कोल्हापूर जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष श्री.बाबा पाटील, कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीचे उपाध्यक्ष श्री. खंडेराव जगदाळे यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी जितेंद्र म्हैशाळे, सागरकुमार चुडाप्पा, श्रीशैल्य मठपती व डॉ. सचिन कोंडेकर यांनी संपादीत केलेल्या एन.एम.एम.एस. मार्गदर्शिका संचाचे प्रकाशन आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शैक्षणिक व्यासपीठाचे सभाध्यक्ष श्री.एस.डी.लाड, प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग, कोल्हापूरचे अध्यक्ष श्री.बी.जी.बोराडे, मुख्याध्यापक संघाचे माजी चेअरमन श्री.के.बी.पोवार, मुख्याध्यापक महामंडळाचे विभागीय अध्यक्ष श्री.एन.आर.भोसले, माजी व्हा.चेअरमन श्री.एन. बी. पाटील, कोजीमाशीचे चेअरमन बाळ डेळेकर, संघाचे माजी सचिव आर. वाय. पाटील, संघाचे सहसचिव अजित रणदिवे, खजाननिस नंदकुमार गाडेकर, लोकल ऑडीटर इरफान अन्सारी, संजय भांदुगरे, सुरेश उगारे, श्रीकांत पाटील, पी. जी.पोवार, जितेंद्र म्हैशाळे, सागर कुमार चुडाप्पा, बसवराज वस्त्रद, सूर्यकांत चव्हाण, जीवनराव साळोखे, एम. के. आळवेकर, शिवाजी माळकर, पी. बी. भारमल, बबन इंदुलकर, जी. के. भोसले, एस. आर. पाटील, सखाराम चौकेकर, जनार्दन दिंडे, संचालिका सौ.अनिता नवाळे, सौ.सारिका यादव, सौ. पी.के.सरदेसाई यांच्यासह आजी, माजी पदाधिकारी, मुख्याध्यापक उपस्थित होते.
प्रारंभी स्वागत मुख्याध्यापक संघांचे चेअरमन सुरेश संकपाळ यांनी, आभार संघाचे व्हा.चेअरमन मिलिंद पांगिरेकर यांनी तर सूत्रसंचालन व्हा.चेअरमन रविंद्र मोरे यांनी केले.