प्रेस मीडिया लाईव्ह :
विशेष प्रतिनिधी : संभाजी चौगुले :
कोल्हापूर : महावितरणच्या गडहिंग्लज विभागामार्फत चंदगड तालुक्यातील शिनोळी येथे (दि.२० सप्टेंबर रोजी ) उद्योग मित्र बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कोल्हापूर मंडळाचे अधीक्षक अभियंता श्री.अंकुर कावळे यांच्या विशेष उपस्थितीत चंदगड तालुक्यातील औद्योगिक संघटनाचे प्रतिनिधी व उद्योजक यांच्या समवेत बैठक संपन्न झाली. यावेळी एमआयडीसीमधील विविध वीज समस्या व उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीस चंदगड तालुका चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष श्री.अर्जुन पाटील, शिनोळी व हलकर्णी एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष विलास देसाई, उद्योजक प्रकाश पाटील, प्रल्हाद जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिनोळी व हलकर्णी एमआयडीसी करिता स्वतंत्र एक्सप्रेस फिडरची मागणी संघटना प्रतिनिधी व उद्योजकांनी केली. यासंदर्भात अधीक्षक अभियंता श्री.अंकुर कावळे यांनी जिल्हा नियोजन व विकास समितीच्या निधीतून स्वतंत्र एक्सप्रेस फिडरसाठी निधी मागणीचा प्रस्ताव मा.श्री.राहुल रेखावर, जिल्हाधिकारी,कोल्हापूर यांच्याकडे पाठवून मंजुरीसाठी पाठपुरावा करू, असे आश्वस्त केले. उद्योजकांनी मांडलेल्या समस्यांचे श्री.कावळे यांनी निराकरण केले. अधिकारी-कर्मचाऱ्यांना ग्राहकांना सुरळीत व तत्पर सेवा देण्याबाबत सूचना केली. सदर बैठकीसाठी कार्यकारी अभियंता श्री.विजयकुमार आडके, चंदगड उपकार्यकारी अभियंता श्री.विशाल लोधी, हलकर्णीचे सहाय्यक अभियंता श्री. गुरुप्रसाद मोरे, शिनोळीचे सहाय्यक अभियंता श्री. विकास कणसे यांच्यासह जनमित्र उपस्थित होते.