प्रेस मीडिया लाईव्ह :
विशेष प्रतिनिधी : संभाजी चौगुले :
कोल्हापूर, ता. ६ – गोल्ड व्हॅल्यूअर्स असोसिएशन, महाराष्ट्रच्या वतीने उद्या (शुक्रवारी) मान्यवरांच्या हस्ते सभासदांना प्रमाणपत्र वितरण करणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.
येथे घेतलेल्या कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व व्हॅल्यूअर्स बंधूंना यावेळी आय कार्ड व सभासद प्रमाणपत्र वितरण होईल. कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या चौथ्या मजल्यावरील हॉलमध्ये शुक्रवार, ता. ८ सायंकाळी ४ वाजता राज्य अध्यक्ष पुरुषोत्तम काळे, तज्ज्ञ मार्गदर्शक भरत ओसवाल, सचिव सतीश पितळे यांच्या हस्ते वितरण होईल. या वेळी व्हॅल्यूअर्सनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष संदीप पावसकर, उपजिल्हाध्यक्ष संजय माने व पश्चिम महाराष्ट्र विभागप्रमुख योगेश कुलथे यांनी केले आहे.
दरम्यान, जिओ कन्व्हेंन्शन सेंटर, मुंबई येथे ३० सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलच्या वतीने होणाऱ्या जीजेएस या प्रदर्शनाची नोंदणीही यावेळी करण्यात येईल. परंपरागत व्यवसायाला नवतंत्रज्ञानाची जोड देण्याच्या दृष्टीने अशा प्रदर्शनाला सराफ व सुवर्णकार व्यावसायिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहणे आवश्यक आहे. त्यासाठी लवकरात लवकर नोंदणी करावी. त्यासाठी कार्यक्रमावेळी सुरेश चौगले यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जीजेसीचे विभागीय सदस्य भरत ओसवाल यांनी केले आहे.