दामदुपटीच्या आमिषाने फसवणूक करून फरार असलेल्या आरोपीच्या घटस्फोटित पत्नी कडुन 50 लाखाची संपती जप्त.


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे  : 

कोल्हापुर -दामदुपटीच्या आमिषाने फसवणूक करून फरार असलेला लोहितसिंगग सुभेदार यांच्या घटस्फोटित पत्नी कडुन हिरयाचे आणि सोन्याचे दागिने मिळुन असा 50 लाख रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ए.एस.ट्रेडर्स या कंपनीच्या विरोधात गुतवणूकदारांच्या कडुन शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आता प्रर्यत पोलिसांनी सात संशयीना अटक केली आहे.ही कारवाई पोलिस अधीक्षक महेद्र पंडीत,आर्थिक गुन्हा शाखेच्या उपअधीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक स्वाती गायकवाड यांच्यासह त्यांच्या पथकाने केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post