कोल्हापुरात गणेशोत्सव नियमाचे पालन करून दणक्यात साजरा करा.जिल्हाधिरी रेखावार .



प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर -आज केशवराव भोसले नाट्यगृह येथे गणेशोत्सव निमीत्त आढ़ावा बैठक आयोजित केली होती.त्या बैठकीत कोल्हापूरचा गणेशोत्सवला एक वेगळेच वैशिष्ठ्य असल्यामुळे या ही वर्षी नियमाचे पालन करत मोठ्या प्रमाणात साजरा करून यात पारंपारिक वाद्यांचा वापर करावा.

आता पर्यंत कोल्हापूरने पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करून आदर्श निर्माण केला आहे.त्यामुळे कोल्हापूरचा पायंडा यंदा ही कायम राखावा असे आवाहन जिल्हाधिरी मा.राहुल रेखावार यांनी केशवराव भोसले नाट्यगृह येथे आयोजित केलेल्या शांतता बैठकीत केले आहे.  जिल्हा पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत,कोल्हापुरच्या आयुक्त के.मंजुलक्ष्मी यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. या वर्षी शासनाने गणेशोत्स्वा साठी पाच लाख रुपयांची योजना जाहीर केली असून चांगले उपक्रम राबविण्यारया मंडळाना बक्षीस देण्यात येणार आहे.या साठी शासनाकडे मंडळानी नोंद करणे आवश्यक आहे.प्रत्येक मंडळानी कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची खबरदारी घेऊन कायद्याचे पालन करत गणेशोत्स्व साजरा करावा .असे आवाहन पो.अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी केले आहे.या उत्सव काळात महिलांच्या सुरक्षीततेकडे लक्ष द्यावे.तसेच गर्दीच्या ठिकाणी सीसीसीटीव्ही बसवावेत अशी मागणी महिला कार्यकर्त्यानी केली आहे.यावेळी प्रशिक्षणार्थी पो.अधीक्षक अन्नपुर्णासिंह,वि.शाखेचे पो.नि.तानाजी सावंत,एलसीबीचे महादेव वाघमोडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post