प्रेस मीडिया लाईव्ह :
विशेष प्रतिनिधी : संभाजी चौगुले :
कोल्हापूर ता. 27 : कसबा बावडा परिसरातील सार्वजनिक गणेश मुर्ती पर्यावरण पूरक राजाराम बंधारा येथे दरवर्षी संकलीत केल्या जातात. गेले दोन दिवस पडत असलेल्या संततधार पावसामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळीत वाढली आहे.
पावसामुळे राजाराम बंधारा पाण्याखाली गेलेला असल्याने दरवर्षी होणाऱ्या मुर्ती संकलन ठिकाणी नदीचे पाणी आलेने या ठिकाणी मुर्ती संकलीत करणे अडचणीचे झालेले आहे. त्यामुळे गुरुवार, दि.28 ऑक्टोंबर 2023 रोजी कसबा बावडा राजाराम बंधारा येथील नदीच्या वरच्या भागातील असलेल्या दत्त मंदीर येथे पर्यावरण पूरक गणेश मुर्ती संकलन करण्याची पर्यायी व्यवस्था कोल्हापूर महापालिकेच्यामार्फत करण्यात आलेली आहे. तरी कसबा बावडा व या परिसरातील सार्वजनिक मंडळांनी पर्यायी बदलाच्या ठिकाणी आपल्या गणेश मुर्तीचे पर्यावरण पूरक विसर्जन करून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.