प्रेस मीडिया लाईव्ह :
विशेष प्रतिनिधी : संभाजी चौगुले
राष्ट्रपिता जोतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने शिक्षकांना पुरस्कार म्हणजे त्यांना प्रेरणा मिळणार, असे प्रतिपादन आमदार जयवंत आसगावकरर यांनी केले.
ते राजर्षि शाहू स्मारक भवन येथे कृती फाउंडेशन व संम्यक शिक्षण विचारमंच यांच्यावतीने आयोजित कार्यक्रमातात बोलत होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. गिरीश मोरे प्रमुख उपस्थित होते. यावेळी काही शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
आ. आसगावकर म्हणाले, सत्य शिक्षण सांगणारे फुले दापंत्य होते.सध्याच्या वातावरणात त्यांच्या विचाराची खऱ्या अर्थाने गरज आहे. शिक्षकांनी ते विचार प्रसार करावे म्हणजे समाजाचे स्वास्थ कायम चांगले राहील.
डॉक्टर गिरीश मोरे यांनी खऱ्या शिक्षक दिन कोणता साजरा करावा याबाबत शिक्षकांनी चिंतन करावे असे सांगितले.शिक्षकांच्या घरांमध्ये संविधानासह सर्व पुरोगामी महापुरुषांच्या विचाराची पुस्तक ग्रंथ असायला हवे.पुरोगामी विचाराचा वारसा जपला तरच मानव जातीमध्ये चांगले स्वास्थ निर्माण होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, पोलीस उपनिरीक्षक अनुराधा पाटील, बालकल्याण समितीच्या सदस्या महिला बालकल्याण समितीच्या सदस्या शिल्पा सुतार, शिवाजी विद्यापीठातील कौशल्य विकास अधिकारी प्रमोद हर्षवर्धन, माजी शिक्षण संचालक महावीर माने, विचारमंचचे भीमराव संघमित्रा, कृतीचे प्रशांत चूयेकर, यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन मनीषा पाटील यांनी केले.आभार पंडित कांबळे यांनी मांनले.