प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर -जादा परताव्याच्या आमिषाने कोट्यावधी रुपयांची फसवणूक करून फरार असणारा ए.एस.ट्रेडिंगचा मास्टर माइन्ड लोहीतसिंग धरमसिंग सुभेदार (रा.पलूस ,सांगली) याला कोल्हापूरच्या आर्थिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने आज कोल्हापुरात अटक केली.
या कंपणीने आता सर्वात मोठी फ़सवणूक केली आहे.या टोळक्याच्या विरुध्दात शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील काही जणांना या पूर्वीच अटक केली आहे.सुभेदार घटना घडल्या पासून पोलिसाना चकवा देत होता.आज कोल्हापुरात येणार असल्याचे समजले वरून त्याला सापळा रचून अटक केली.ही बातमी समजताच गुंतवणूकदारांनी शाहुपुरी पोलिस ठाण्यासमोर गर्दी केली होती.