नगररचना विभागाकडील तक्रारी बुधवारी नगरचना कार्यालयात स्विकारणार

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

विशेष प्रतिनिधी: संभाजी चौगुले 

कोल्हापूर ता.05 :- प्रशासनाला असे निदर्शनास आले की नगररचना विभागाकडील बांधकामाबाबत तक्रारीचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे नगररचना विभागाकडील नागरीकांच्या तक्रारी बाबत भेटीसाठी बुधवारी सकाळी 11.00 ते दुपारी 1.00 या वेळेत जनता बझार येथील नगररचना कार्यालयात नागरीकांच्या तक्रारी स्विकारण्यात येणार आहे.

 यावेळी सहा.संचालक नगररचनाकार, उप-शहर रचनाकार व सर्व कनिष्ठ अभियंता या ठिकाणी उपस्थित असणार आहेत. तरी शहरातील नागरीकांनी नगररचना विभागाशी निगडीत असलेल्या आपल्या तक्रारी महापालिकेने निश्चित करुन दिलेल्या ठिकाणी मांडाव्यात असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post