प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- आज शहरात मोठ्या भक्तीमय वातावरणात "गणपती बाप्पा मोरया,पुढ़च्या वर्षी लवकर या "च्या गजरात पंचगंगा नदीपात्रात घरगुती गणपतीचे विसर्जन रात्री उशिरापर्यंत करण्यात आले. कोल्हापूर महानगरपालिकेने पंचगंगेचे पाणी प्रदूषीत होऊ नये म्हणून शहरात ठिक ठिकाणी कुंडाची सोय करून गणेशमुर्ती दान करण्याचे आव्हान केले होते.
काहीनी अल्प प्रतिसाद देऊन गणेशमुर्ती असलेल्या कुंडात विसर्जन करून दान करीत होते.पण हिंदुत्ववादी संघटना आक्रमक होऊन पंचगंगेतच विसर्जन करणार या मतावर ठाम होती.कोल्हापुर महानगरपालिकेने पाणी दुषित होते म्हणुन या संघटनेला विरोध केला होता.त्यावेळेस हिंदुत्ववादी संघटनानी आक्रमक पवित्रा घेत जर गणेशमुर्तीने पाणी दुषित होते तर कारखान्याचे मळीयुक्त सांडपाणी ,रस्त्यावर वाहून नदीपात्रात मिसळते तेव्हा पाणी दुषित होत नाही का असे म्हणत लावलेली ब्र्यकेट तोडुन या संघटनेचे कार्यकर्ते गटागटाने उभारुन नागरिकांना पंचगंगेतच मुर्तीचे विसर्जन करा असे आवाहन करीत होते.तर पोलिस प्रशासन एका बाजूला उभे होते.नागरिकांनी गणेशमुर्तीचे विसर्जन जास्तीतजास्त नदी पात्रातच केले.तर दुसरीकडे कोल्हापुर महानगरपालिचे कर्मचारी नागरिकांना गणेशमुर्ती असलेल्या कुंडात विसर्जन करून मुर्ती दान करण्याचं आव्हान करीत होते.या वेळी पोलिस प्रशासनाने पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवला होता.