प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- आंबेवाडी येथे रेडेडोह जवळ भरधाव वेगाने येणारया कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात पंकज भाऊसो जाधव (वय 21.रा.दरेवाडी) याचा जागीच मृत्यू झाला.तर दोघे जण गंभीर जखमीसह एकूण अकरा जण जखमी झाले आहेत. हा अपघात आज दुपारी साडे चारच्या सुमारास झाला आहे.
या अपघाताची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली आहे.अधिक माहिती अशी की,अहमदनगर येथील सुंदर बिडगर हे आपल्या कुंटुबियासमवेत कारने जोतिबा दर्शनासाठी गेले होते.परत येताना आंबेवाडी येथे रेडेडोह जवळ आल्यावर कारचे नियंत्रण सुटल्याने मुश्ताक अजीज शेख (रा.बाराईमाम)हे आज दुपारी मुंबईहून आलेल्या अभिजीत आम्ब्रुसकर हे पत्नी रुचिरा व लहान मुली सोबत शेख यांच्या रिक्षाने जोतिबाला जात असताना भरधाव येणारयां कारने धडक दिल्याने रिक्षा पलटी होऊन शेजारील शेतात पडून रिक्षा पाठोपाठ येणारया दुचाकीला धडक दिल्याने दुचाकी वरील पंकज जाधव हा जागीच ठार झाला.पंकज हा आपला आतेभाऊ रमेश अमर बजागे (पडवळवाडी) यांच्या सोबत भाचीचा वाढदिवस असल्याने गिफ्ट म्हणून लहान सायकल आणि केक घेऊन चालला होता.पंकज हा शिक्षण घेत खाजगी नोकरी करीत होता.त्याच्या पश्च्यात आई वडील आणि विवाहीत बहीण असून हा एकुलता एक मुलगा होता.जखमीं ना सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहीना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.यातील दोघं गंभीर जखमी झाले आहेत.तर बाकीचे किरकोळ जखमी झाले आहेत.पुढ़ील तपास करवीर पोलिस करीत आहेत.