प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- करवीर तालुक्यातिल रजपुतवाडी येथे रविवार पेठ परिसरात रहाणारा नदिम उर्फ शाहरुख शौकत बागवान (वय 28)याच्यावर झालेल्या चाकू हल्यात गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अधिक माहिती अशी की,नदिम बागवान हा फळ विक्रेता आहे.हा सायंकाळी घरी येऊन साडेसातच्या सुमारास आपली दुचाकी घेऊन गेला होता.रजपुतवाडी येथे सिंमेंट पाईप कारखान्या जवळ काही तरुणांनी त्याच्या पोटावर ,गळ्यावर चाकूने वार करून पसार झाले.ही घटना साडे आठच्या सुमारास घडली असून नदिम यांच्या मोबाईल वरुन त्याच्या नातेवाईकांना या घटनेची माहिती दिली अ सता त्याचे नातेवाई घटना स्थळी धाव घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने चाकू हल्ला झाल्याची माहिती नातेवाईकांना दिली.जखमी नदिमला प्रथम सीपीआर येथे आणून त्याच्या नातेवाईकांनी बाहेरच्या बाहेर खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.पोलिस त्याचा जबाब घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत चालू होते.अधिक तपास करवीर पोलिस करीत आहेत.