प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर-नगररचना विभागात नागरिकांच्या तक्रारी वाढ़त आहेत.प्रत्येक नागरिक आपल्या कामासाठी वारंवार चकरा मारतच आहेत.काही वेळा संबंधित अधिकारी भेटतच नाहीत.जर भेटले तर काहीतरी कारण सांगून टाळाटाळ करतात.काही वेळा मर्जीतील लोकांची कामे होतात.पण सर्व सामान्य माणसांची कामेच होत नाहीत.
या कडे वरिष्ठ अधिकारी यांचे दुर्लक्ष होत आहे.काहीनी बेकायदेशीर बांधकाम सुरू असल्याचे सांगितले तर तक्रारदाकडेच कागदपत्राची मागणी करुन आज बघुया ,परवा पाहुया म्हणून जबाबदारी टाळत असतात.अशा कर्मचारी अधिकारी वर्गावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.स्थानिक पालिका प्रशासनाला त्यांच्या अख्त्यारीत उभ्या रहात असलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत सविस्तर माहिती असते मग अशा वेळी संबंधितांना नोटीस पाठवून आणि त्यापुढ़ील कार्यवाही का करीत नाहीत असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.याबाबतीत आयुक्तसो यांनी स्वतःलक्ष घालुन कामचुकार करण्यात यावी .काही जिल्हया बाहेर ज्या महापालिका क्षेत्रात अशी बेकायदेशीर बांधकाम सुरू आहेत.त्यांच्यावर कोणतीच कारवाई नाही झाली तर संबंधित आयुक्तांना जबाबदार धरले जाते.पण आयुक्ताना जबाबदार धरण्या ऐवजी त्या त्या विभागातील कामचुकार कर्मचारी अधिकारी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.एका वॉर्डातील विना परवाना बांधकाम सुरू असल्याची तक्रार केली असता तत्कालीन आयुक्त डॉ.कांदबरी बलकवडे यांनी संबंधित विभागाच्या अधिकारी यांना त्या बांधकामावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्या वेळी संबंधित विभागाने बेकायदेशीर बांधकाम करण्यारया संबंधितांना फक्त नोटीस पाठविली पण आज अखेर पुढ़ील कारवाई करण्याचे धाडस झाले नाही.अशा कामचुकार कर्मचारी अधिकारी यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे.तरच पुढ़च्यास ठेच लागून मागचा शहाणा होईल.